आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना बदलण्याचं काम शिंदे- फडणवीस सरकारकडून सूरू आहे.
सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा जनतेतून करण्याची, तसेच महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेतही बदल करण्याचे संकेत शिंदे- फडणवीस सरकारने दिले आहेत. यावरून आता मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची नाराजी; अनेकांनी सोडली शिवसेनेची साथ, केला मनसेत प्रवेश
सरकार बदलले. असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल … , असा दावा वसंत मोरे यांनी यावेळी केला.
सरकार बदलले.
असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल …#पुणे— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 7, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे हे हिंदूजननायक! त्यांची आणि बाळासाहेबांची भूमिका एकच
फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं; विनायक राऊतांचा खोचक टोला
शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…