आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच अभिनंदन केलं आहे.
हे ही वाचा : शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन
दरम्यान, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रात शिंदे सरकार; आज सायंकाळी 7 वाजता होणार शपथविधी?
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…