“आत्ता छावा मैदानात, दसऱ्यानंतर आता वाघही थेट मैदानात उतरणार”

0
466

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चढाओढ सूरू आहे. तसेच शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी एक मोठं विधान केलं आहे.

दसऱ्यामध्ये विचारांचे सोने लूटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं. तसेच आता छावा बाहेर असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांचे कौतुक केले. पण आता वाघही मैदानात उतरणार असल्याचं वरूण सरदेसाईंनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा : आंबेडकर चळवळीतील ‘या’ ज्येष्ठ नेत्याची उद्धव ठाकरेंना साथ; शिवसेनेत केला प्रवेश

शिवसंवाद यात्रा सुरु असतानाच दुसरीकडे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे देखील तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. यावेळी मेळाव्यात बोलताना. आतापर्यंत छावा मैदानात होता आता दसऱ्यानंतर आता थेट वाघच मैदनात उतरणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

वेदांता प्रकरणावरून गिरीश महाजनांचा महाविकास आघाडीला टोला, म्हणाले, त्यांना वाईनसाठी…

“राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, नवाब मलिकांना डच्चू”

लवकरच 50 खोक्यांचा हिशोब सबळ पुराव्यानिशी जाहीर करू; शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here