आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडी होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना सदृश्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली असून त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. कोश्यारी यांना रिलायन्स हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सूरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही समोर आलं आहे.
हे ही वाचा : “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप?; एकनाथ शिंदेंसह 40 आमदार सूरतहून गुवाहाटीत दाखल”
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी 1 वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. तसेच दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, अशा चर्चा होत्या. मात्र राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यानं ते मुंबईत जाणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता- अभिजीत बिचुकले
एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा खोचक शिवसेनेला टोला, म्हणाले…