आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 आमदारांसह गुजराथमध्ये तळ ठोकून आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही, असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “सत्तेसाठी आम्ही कधीही…” ; एकनाथ शिंदे यांनी केलं ट्वीट
एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही काही चुकीचं करतील अस वाटत नाही. सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे, असंही देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेला मोठा झटका! एकनाथ शिंदेंसह 13 आमदार नॉट रिचेबल
“योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार; पुढील 2 महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार”
विधान परिषद निवडणूक निकाल! भाजपाचे पाच उमेदवार विजयी, तर काँग्रेसला मोठा धक्का