आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच येत्या 20 तारखेला 10 जागांसाठी 11 जणांमध्ये ही लढत होणार आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे.
अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान कशा पद्धतीने करावे याबाबतची रंगीत तालीम शिवसेनेच्या आमदारांसाठी पार पडली. या बैठकीनंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्या संपर्कात आहे, ते आम्हांलाच मतदान करतील, असा विश्वास आम्हांला आहे, असा मिश्कीली टोला बच्चू कडूंनी यावेळी लगावला.
हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अनोळखी कार, अपघात थोडक्यात वाचला, ठाकरे स्वत: चालवत होते गाडी”
आज मतदान कसे करावे याबाबत ट्रायल होती. राज्यसभेत केलेली चूक या निवडनुकीत होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्याशी उद्या चर्चा करणार आहेत. तसेच, आम्ही पण संपर्कात आहोत की, देवेंद्रजी आम्हांला कसं मत देतील, तसेच मला पूर्ण विश्वास आहे की, देवेंद्रजी आम्हांला मत देतील, अशी मिश्कीली प्रतिक्रिया बच्चू कडूंनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘शिवसेना उमेदवाराला मत द्या, अन्…; शिवसेनेकडून अपक्ष आमदाराला ऑफर?
अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात देवगिरी बंगल्यावर खलबतं: चर्चांना उधाण
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांसोबत काय घडलं?; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…