काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेकडून राज्यसभा मिळवण्यासाठी इच्छुक होता; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

0
621

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा शिवसेनेवर टीका करत असले तरी मिलिंद देवरा हे शिवसेनेकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.

हे ही वाचा : ‘ ते’ पंतप्रधानाच्या शर्यतीत, पण भाजपने…; सभागृहात जयंत पाटलांची टोलेबाजी

शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मिलिंद देवरा प्रयत्न करत होते. पण शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केल्याचा दावाही शिवसेना नेत्याने केला आहे.

दरम्यान, शिवसेना नेत्याच्या या खासगीतील दाव्याबाबत शिवसेना नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत. मात्र, मैत्रीपोटी आदित्य ठाकरे यांनी देवरा यांच्यावर आरोप करणे आणि त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पुन्हा एक वादग्रस्त विधान, म्हणाले…

भाजपमध्ये तुमचा अपमान होतोय, तुम्ही आमच्याकडे या, मुख्यमंत्री करू; जयंत पाटलांनी शिंदेंना खुली ऑफर

“मनसेत जोरदार इनकमिंग; वंचित बहुजन आघाडीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला मनसेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here