आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानावर आज ई़डीने धाड टाकली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
याआधीही भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना अशा कारवाईंना सामोरं जावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची माहिती सोमय्या यांना सर्वप्रथम कशी मिळते, असा प्रश्न उपस्थित होतो. याचं उत्तर स्वत: किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीची मोठी खेळी; भाजपच्या ‘या’ माजी आमदाराच्या नातवानं हाती बांधलं घड्याळ”
ईडी असेल आयकर विभाग असेल यांचा मी पाठवुरावा करतो. तुरुंगात जावं लागतंय हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कोण अगोदर सांगतंय कोण नंतर सांगतंय याबद्दल काही देणघेणं नाही. ज्यांनी महाराष्ट्राला लुटलं ते तुरुंगात जात आहेत, याचा महाराष्ट्रातील जनतेला आनंद आहे, असं सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थनात आता मनसे मैदानात, ट्विट करत म्हणाले…
मनसेचा विजयी झेंडा ; ‘या’ निवडणूकीत मनसेनं मारली बाजी
गुजरातमध्ये भाजपाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा 1300 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश