“अखेर संजय राऊत यांना ईडीकडून अटक, महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसात FIR दाखल”

0
12

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून काल रात्री ईडीनं संजय राऊत यांना अटक केली.

राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर राऊत यांना ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आलं. तिथे रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांचे बंधू सूनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

हे ही वाचा : काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकिय चर्चांना उधाण

संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा त्यांना घाबरत असल्याने त्यांना अटक करण्यात आलीय. त्यांनी आम्हाला अटकेसंदर्भातील कागदपत्रं दिलेली नाहीत. त्यांना यात गोवण्यात आलेलं आहे, असा आरोपही सुनील राऊत यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; घोडबंदर परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“आता शिवसेनेत दिघे राज चालणार; आनंद दिघेंच्या पुतण्याला उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”

संजय राऊतांवरील कारवाईनंतर, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here