आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत घोषणा केली.
मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेवर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. त्यामुळे आपला राज्यसभेतील आपला मार्ग सुकर होण्यासाठी संभाजीराजे आता शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
हे ही वाचा : यापुढे महिलेवर हात उगाराल तर…; पुणे मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा
दरम्यान, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी देण्यात येईल, अशी ऑफर संभाजीराजेंना आली आहे. त्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची समोर आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, रामदास आठवलेंचे जुने सहकारी एम.डी.शेवाळे यांचं निधन”
“….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”
रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात- गोपीचंद पडळकर