Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवरून मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवरून मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यात जोरदार राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. तसेच 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी काय तो सवाल जवाब होऊन जाऊ दे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. यावरून मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत, मुख्यमंत्र्यांच्या सभेला अटी, सवाल आहेत का?, असा सवाल करत शिवसेनेला डिवचलं आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन”

राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी,शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी,शर्ती आहेत का ? आमचं सरकार आल की मशिदींवरील भोंगे,रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांच स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का? बाकी टोमणे सभेला शुभेच्छा.! , असा टोला गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा

मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे- नाना पटोले

“राज ठाकरेंचा राजकीय गेम होईल, तेंव्हा त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही”