आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : कृष्णा खोरे लवादाच्या वाटपातील अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळणार आणि त्यातून टेंभू योजनेच्या 6 व्या ‘अ’ आणि ‘ब’ टप्प्याला पाणी देणार, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलं होतं. यानंतर शिवसेनेचे आमदार बाबर यांनी तुम्हाला सहाव्या टप्प्यातील गावं आणि भिजणारं क्षेत्र तरी माहीत आहे का? असा सवाल केला होता. त्यावरुन आता विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते अॅड. वैभव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली आहे.
“कुणाला कमी लेखू नका. तुम्हाला एवढंच जर वाटत असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि जनतेला सामोरं जावून दाखवा. आम्ही किंवा आमच्यापैकी कुणालाही राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली, तर शंभर टक्के या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून येईल, असं वैभव पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत राणांना, गुलाबराव पाटलांचं जोरदार उत्तर, म्हणाले…
सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर मतदारसंघातील वंचित गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार मांडला. त्यानंतर टेंभू च्या ६ ‘अ’ आणि ६ ‘ब’ या टप्प्यांना मंजुरी मिळाली. याबद्दल आम्ही आनंद साजरा केला, पेढे वाटले, फटाके फोडले तर तुमच्या पोटात का दुखले? हे खानापूरच्या जनतेला समजलं नाही, असंही वैभव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी एक आदेश दिला तर खानापूर-आटपाडीचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा विश्वासही वैभव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण”
राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यामुळे…- रामदास आठवले