आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. काल 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, असा राज यांनी यावेळी सरकारला इशारा दिला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर राज्यातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यानंतर आज राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ट्विट करत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
हे ही वाचा : …आणि मविआ सरकार राज ठाकरेंना तुरूंगात डांबेल- चंद्रकांत पाटील
या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद”, असं बाळासाहेबांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल”
“गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”