Home महाराष्ट्र “मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल”

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : 1 मे महाराष्ट्र दिना रोजी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राज ठाकरेंसोबत सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांसह गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललेत.

हे ही वाचा : “गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

दरम्यान, राज ठाकरेंना सभेसाठी पोलिसांकडून 16 अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता बाळगावी, कोणताही धर्म, प्रांत, वंश आणि जात यावरून आक्षेपार्ह विधान करू नये, सभेच्या आधी मिरवणूक काढू नये, अशा काही प्रमुख अटींचा समावेश होता. राज ठाकरेंच्या या भाषणादरम्यान बहुतांश अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाले, असा दावा पोलिसांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून, बाबरीच्या ढांच्यावर…; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

“राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता मनसे नेते गृहविभागाच्या टार्गेटवर; ‘या’ 2 मोठ्या नेत्यांना पोलिसांची नोटीस”

“विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं?, एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही काढली पठ्ठ्यानं”