आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 1 मे महाराष्ट्रदिनी भाजपची सभा जोरदार पार पडली. या सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. राममंदिर आंदोलनातील शिवसेनेच्या सहभागाबाबत फडणवीसांनी यावेळी सवाल उपस्थित केला. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
“बाबरीचा ढाचा या विषयावर आपले विरोधी पक्षनेते इतके बोलले की, जणू देशात आता कोणतेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत. बाबरी कोसळली आहे व श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे ही समस्त हिंदू जनांसाठी अभिमानाची बाब आहे, पण आता देशात सगळ्यांना सुखी ठेवणारे ‘रामराज्य’ आणायला हवे असे या लोकांना का वाटत नाही?, असं सामनात म्हटलं.
हे ही वाचा : “राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता मनसे नेते गृहविभागाच्या टार्गेटवर; ‘या’ 2 मोठ्या नेत्यांना पोलिसांची नोटीस”
दरम्यान, फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेंव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही, असाही पलटवार शिवसेनेनं केला.
महत्वाच्या घडामोडी –
“विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं?, एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही काढली पठ्ठ्यानं”
राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“जसं शेन वाॅर्नला स्वप्नात सचिन तेंडूलकर दिसायचा, तसं राज यांना शरद पवार दिसतात”