आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर काही दिवस सदावर्ते पोलिस कोठडीत होते.
हे ही वाचा : “भाजपचा मनसेला धक्का; ‘या’ माजी मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
गुणरत्न सदावर्ते तब्बल 18 दिवसांनंतर कारागृहाबाहेर आले आहेत. त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज ते 18 दिवसानंतर कारागृहातून बाहेर आले आहेत. बाहेर येताच हम है हिंदुस्तानी च्या घोषणा सदावर्तेंनी दिल्या. ही आहे झेन सदावर्ते माझी 13 वर्षांची मुलगी आणि आहे माझी पत्नी जयश्री पाटील आणि या मित्र परिवाराने या अन्यायाविरोधात मला साथ दिली., अशी प्रतिक्रिया सदावर्तेंनी यावेळी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“Breaking News! राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू”
राणा दाम्पत्यानं दिलेल्या आव्हानानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं जोरदार उत्तर, म्हणाले…
“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”