आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे. मात्र त्याआधीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आजपासून 9 मे पर्यंत हे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई, असे आदेश काढले आहेत.
हे ही वाचा : राणा दाम्पत्यानं दिलेल्या आव्हानानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं जोरदार उत्तर, म्हणाले…
दरम्यान, 1 मे ला आपली सभा औरंगाबादमध्ये होणार, असं राज ठाकरेंन पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. मात्र राज यांच्या सभेआधीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
असं कुठं असतं का किरीटजी?; स्वतःच नखाने मारून रक्त काढता, आणि मग नंतर…; रूपाली पाटलांचा घणाघात
शिंदे आजींच्या भेटीवरुन मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…