आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सध्याच्या राजकीय घडामोडीला मनसे विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली असल्याचं पहायला मिळत आहे. यावरून, भाजपची भूमिका राज ठाकरे मांडत असल्याची टीका शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बाॅबी डार्लिंग; मनसेचा टोला
निवडणुकीमध्ये जेंव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबत होते तेंव्हा त्यांना त्यांचे बोल गुलूगुलू वाटत होते, गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर त्यांना खाजवायला होत आहे, असा टोला फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लगावला.
दरम्यान, मला असं वाटतं, की कुठेतरी राज ठाकरेंचा घाव वर्मी लागतोय. भाजपला कोणालाही समोर करायची गरज नाहीय. भाजप सक्षम आहे, असा पलटवार फडणवीसांनी यावेळी केला.
भाजपाला कुणालाही समोर करण्याची गरज नाही.
भाजपा आपली लढाई लढण्यास सक्षम आहे.
माध्यमांशी संवाद…https://t.co/IwKdjA8dvo#BJP pic.twitter.com/Y4O3IVKujT— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 20, 2022
महत्वाच्या घडामोडी –
…अन् भर मंडपात नवरदेवीनं चक्क नवरदेवाला लगावली कानाखाली; व्हिडिओ जोरदार व्हायरल
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मी, मान्य करतो; गुणरत्न सदावर्तेंकडून कबुली
राज ठाकरेंना खाज ठाकरे बोलणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…