दबंग-3 सिनेमा रिलिज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात

0
188

मुंबई : सलमान खानचा दबंग-3 सिनेमा रिलिज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडा आहे. सलमान खानच्या दबंग-3 सिनेमातील हुड हुड दबंग गाण्यावर हिंदू जन जागृती समितीनं आक्षेप घेतला आहे.

सोशल मीडियावर #BoycottDabangg3 हा हॅशटॅन तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी ह्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे.

या गाण्यामध्ये साधू-संत सलमान खानच्या मागे नाचताना दिसत आहेत. हुड हुड दबंग गाण्यावर साधू संत नाचताना शूट केलं आहे. अशा पद्धतीनं साधू संतांचा अपमान सहन केला जाणार नाही. असं नेटकऱ्याचं म्हणनं आहे. नेटकऱ्यांनी सलमान खानसोबतच इतर कलाकारांनाही सुनावलं आहे.

दरम्यान हे गाणं चित्रपटातून हटवण्याची मागणी हिंदू जन जागृती समिती आणि नेटकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here