आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली.
राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. नंतर ठाण्यातल्या उत्तर सभेत त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. यावरून आता माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर निशाणा साधला.
हे ही वाचा : “राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकते का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर, म्हणाले… साहेब म्हणजे…”
राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारं असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, असं लक्ष्मण माने म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी लक्ष्मण माने यांनी यावेळी केली.
दरम्यान, ज्या सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय आहे?, असा संतप्त सवालही लक्ष्मण माने यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरविली जात असेल तर हरकत नाही”
“शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मंत्रीपद परत मिळणार?; चर्चांना उधाण”
राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका