आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या.
अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आता सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.
हाय कोर्टाकडून एसटी कामगारांना कामावर रुजू होण्याची एक संधी मिळाली आहे. त्यामुळे कामगारांनी गिरणी कामगार होण्यापेक्षा कामावर हजर व्हावे. एसटी कामगारांची बाजू मांडण्यात त्यांचे वकील कमी पडले आहेत. त्याचबरोबर वकिलांनी आपली बाजू कोर्टात मांडायची असते, रस्त्यावर मांडायची नसते., असा जोरदार टोला प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सदावर्तेंना लगावला. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “…म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे”
दरम्यान, या सरकारने एसटी कामागरांचे शोषणच केले आहे. शरद पवार हे सत्तेत नाही, मात्र, त्यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा विचार करावा, असंही आंबेडकर म्हणाले. तसेच कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून याचा आम्ही त्याचा निषेधच केला. मात्र एसटी कामगारांची कोर्टात ज्या पद्धतीने वकीलांनी बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही. आता कोर्टाने एक संधी दिली आहे त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असं आवाहनही आंबेडकरांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?; जयंत पाटलांचा सवाल
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
मी मनसेतच राहणार, आता सगळ्या ऑफर्स संपल्या; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांचं विधान