आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. यावरुन आता विरोधी पक्षनेत्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. पण अशा घटना घडण्यामागे नेमकं कारण काय आहे, याचाही शोध घ्यायला हवा, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मुंबई भाजपच्या चित्रपट, नाट्य आघाडीतर्फे रविवारी महारोजगार मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
हे ही वाचा : मी मनसेतच राहणार, आता सगळ्या ऑफर्स संपल्या; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांचं विधान
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे केवळ राज्यातील किंवा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही. कामगारांचे हाल होत असताना सरकारने त्यांना मदत देणे अपेक्षित होते. पण सरकारने तसं केलं नाही. हे सरकार कमालीचं उदासीन आहे, अशी टीकाही अमृता फडणवीसांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! कोल्हापूरात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात सापडली पैशांची पाकिटं
गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला