Home पुणे “पुणे अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काहीही झालं तरी…”

“पुणे अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काहीही झालं तरी…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं असून मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सही असलेले नियुक्ती पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आलं आहे. मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत राज ठाकरेंच्या निर्णयानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावरून आता वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यानंतरही मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, इतक्यात तरी मनसे सोडायची इच्छा नाही, त्यामुळे साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे, तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : मुंबईत येताच संजय राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

गेल्या 2-3 दिवसांपासून खूप लोक मला मनसे सोडण्यासाठी संपर्क करत आहेत. मात्र मी सर्वांना आत्ताच मनसे सोडण्याचा विचार नाही, असं सांगत आहे. ज्या दिवशी माझ्या मनात अस विचार येईल त्या दिवशी मी उघडपणे सांगेल, असंच मी सर्वपक्षीय लोकांना सांगत आहे, असंही वसंत मोरे म्हणाले.

दरम्यान, गेली 27 वर्षे मी राज ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे पुढेही त्यांच्या सोबत राहीन. माझं साहेबांशी काही बोलणं झालं नाही, मात्र माझं पुण्याचं अध्यक्षपद गेलंंय. मात्र अजूनही माझं मनसे सैनिक पद गेलेलं नाही. मला अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, असंही मोरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

वसंत मोरेंची राजकीय हत्या का केली?; रुपाली पाटलांची प्रतिक्रिया

किरीट सोमय्या मला घाबरतो, त्यामुळे…; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

मोठी बातमी; मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी