आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप-शिवसेनेची युती होणार, अशा चर्चा सुरू आहेत. यावरून आता शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्याकडून जी वागणूक दिली जात आहे, त्यामुळे मैत्री होणार की नाही, हा दुसरा भाग आहे. मुळात आपल्यावर अन्याय होत असेल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ते कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारला फटकारलं, म्हणाले…
दरम्यान, सध्या बिगर भाजप राज्यात राजकीय डावपेच सुरू आहेत. आम्ही लढायला तयार आहोत. नैराश्यातून सुरू असलेले हे गलिच्छ राजकारण बंद करण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कोकणात राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवसेनेसह इतर पक्षातील नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”
षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांना काय बोलणार; जयंत पाटलांचा सुजय विखे पाटलांवर पलटवार