Home महाराष्ट्र सदाभाऊची गत आता पाण्याविना मासोळी अशी झालीये; अमोल मिटकरींचा पलटवार

सदाभाऊची गत आता पाण्याविना मासोळी अशी झालीये; अमोल मिटकरींचा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.

‘शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलेलं नाही. त्यांनी, जाईल तिथे लाग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे. आयुष्यभर त्यांनी आग लावायचे काम केले. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असं करावं, असा घणाघात सदाभाऊंनी केला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : शिवसेना-भाजप युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहीत आहे. काश्मीर फाईलच्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आता सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला. तसंच सदाभाऊ हे स्वत: बोलत नाहीत, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस बोलतात, असा आरोपही मिटकरींनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारला फटकारलं, म्हणाले…

“कोकणात राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवसेनेसह इतर पक्षातील नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांना काय बोलणार; जयंत पाटलांचा सुजय विखे पाटलांवर पलटवार