Home महाराष्ट्र आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारला फटकारलं, म्हणाले…

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारला फटकारलं, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळं सर्वसामान्य नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 मार्च रोजी विधानसभेत मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर विरोधी पक्षाकडून आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “कोकणात राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवसेनेसह इतर पक्षातील नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. गृहनिर्माण योजनेतील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र, आमदारांना घर देताना त्याची योग्य ती किंमत घेतली पाहिजे, असं पवारांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, त्यामुळे शरद पवार यांनी आमदारांच्या घराच्या निर्णयावरुन सरकारला फटकारल्याची चर्चा राज्यात सध्या सुरु आहे.

महत्वाच्या घडामोडी –

षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांना काय बोलणार; जयंत पाटलांचा सुजय विखे पाटलांवर पलटवार

“राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकासह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

“शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादीचे ‘ते’ 5 नेते आज शिवबंधन हाती बांधणार”