आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यात भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. इंदापूरच्या विद्यमान पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे आणि त्यांचे पती बापुराव शेंडे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
हे ही वाचा : काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार; नाना पटोलेंनी सुजय विखे पाटलांना सुनावलं
स्वाती शेंडे, बापुराव शेंडे आणि श्रीमंत ढोले यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून एप्रिल महिन्याच्या 3 तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्रीमंत ढोले व बापूराव शेंडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादीचे ‘ते’ 5 नेते आज शिवबंधन हाती बांधणार”
“शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत प्रवेश”
उद्धव ठाकरे किती भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे- चंद्रकांत पाटील