आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं काँग्रेसला मोठा दणका दिला आहे.
काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे व त्यांच्या पत्नी स्मिता शिरोळे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिरोळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
हे ही वाचा : कुणाल हातोडा, कुणाला कुदळ घ्यायची आहे ते घ्या, पण शिवरायांचा हा मर्द मराठा मावळा…; शिवसेनेचा सोमय्यांवर हल्लाबोल
दरम्यान, शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळे यांनी शिवबंधन हाती बांधलं.
महत्वाच्या घडामोडी –
आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी