आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लासलगाव : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची काल भेट घेतली. या भेटीवरून चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप राजेश टोपे यांनी या भेटीत ‘एमआयएम’वर केला. यावरून जलील यांनी, हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असं आवाहन केलं. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय’ असा खोचक सल्लाही दिला. मात्र शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं. टोपेंच्या या विधानावरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राष्ट्रवादी, मलिकांचा राजीनामा घेत नाही- चंद्रकांत पाटील
इम्तियाज ललील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. शरद पवार साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. ते लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील विंचूर येथे बोलत होते.
महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष टिकणार आहे. या पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी. ‘एमआयएम’ला भाजपची ‘बी’ टी म्हणतात. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला. खरं तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा गाैफ्यस्फोट
शरद पवार पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार; गोपीचंद पडळकरांचा टोला
भाजपची काळजी करू नका, स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनून दाखवा; भाजपचा पवारांवर पलटवार