आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या आमदारांना मार्गदर्शन करताना यावेळी, भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी या आमदारांना यावेळी दिला. यावरून आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
आदरणीय पवारसाहेब, भाजपची काळजी करु नका. स्वत:च्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा’, असा पलटवार भाजपनं केलाय. भाजपच्या अधिकृत ट्विट हँडलवरून याबाबत ट्विट केलं आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका
आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!, , आव्हान भाजपनं दिलं आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा.
इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात.
55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
महत्वाच्या घडामोडी –
मनसेची अनोखी बॅनरबाजी; शिवसेनेचं अभिनंदन करणारा उलटा बॅनर लावला
महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात निर्धार
भाजपला राज्यात पुन्हा येऊन देणार नाही; शरद पवारांनी फोडली डरकाळी