मुंबई : सध्या करोना व्हायरसमुळे देशात तिसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरराज्यात गेले आणि तिथेच अडकून पडले आहेत. त्यांना राज्यात माघारी आणण्यासाठी राज्य सराकर प्रयत्न करत आहे. नोकरीसाठी चेन्नईला गेलेला ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचा एक विद्यार्थी तिथेच अडकला. त्याच्या वडिलांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच मेलद्वारे पत्र पाठवत मुलासाठी मदतीची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ या पत्राची दखल घेत मदत केली.
“आसा मोहरा झाला नाही कधीही न होणार, उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार. असं म्हणत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणारे मध्यमवर्गीय लोटन सोनार मुख्यमंत्र्यांना धन्यवाद म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य आपल्या रुपाने कार्यक्षम व कर्तबगार मुख्यमंत्री लाभल्याने आम्ही सामान्य नागरीक आनंदीत आहोत. माझ्या सारख्या सामान्य नागरिकाचा विनंती अर्जाचा आपण तत्काळ दयाऴूपणाने विचार करुन पुढील कार्यवाही साठी रवाना केला. त्यामुळे माझ्या मुलाला चेन्नईला हॉटेल मध्येच राहण्याची परवानगी मिळाली. साहेब आपल्या या कार्यतत्परतेमुळे हे शक्य झाले. आपले कोटी कोटी धन्यवाद, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना इशारा
भाजपाने रडीचा डाव खेळू नये; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर
निवडणुकी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस
आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं- देवेंद्र फडणवीस