आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतुक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. खेळाडूंच्या प्रवासासाठी आलेली बस मनसेनं फोडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. बस फोडल्यानंतर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रा मध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर, प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच?, असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपलं नशीब आजमावयला आले होते, पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी ट्विटवरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
महाराष्ट्रा मध्ये ipl चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 17, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरूच, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
“माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन, कोपरगाव येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास”
सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला टोला