Home महत्वाच्या बातम्या नितेश राणेंच्या ‘या’ निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा

नितेश राणेंच्या ‘या’ निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा

सध्या देशभरामध्ये दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार, गोवा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून  ‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली आहे. मात्र नितेश राणे यांच्यानंतर राणे कुटुंबियांचे कट्टर विरोधक असणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही हा चित्रपट टॅक्स फ्री करावा असं मत व्यक्त केलंय.

शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण चित्रपट अद्याप पाहिला नसला तरी काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन हा महत्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलंय.

हे ही वाचा : शरद पवार-संजय राऊतांमध्ये बंद दाराआड चर्चा; राजकिय गोटात खळबळ, तर चर्चेचा विषय गुलदस्त्यात

“मी तो चित्रपट पाहिला नाही त्यामुळे मी त्यावर कमेंट करु शकत नाही. काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन हा महत्वाचा मुद्दा आहेच. काल सुद्धा काश्मीवर सभागृहात चर्चा झाली,” असं विनायक राऊत यांनी मंगळवारी म्हटलं.

दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगला असून अशा चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्याचं सांगत विनायक राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना विनायक राऊत यांनी, “पंतप्रधान ते म्हणत असतील तर ते योग्यच आहे,” असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

 ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; रामदास आठवलेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मोठी बातमी! बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

‘देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा अन्…’- चंद्रशेखर बावनकुळे