Home जळगाव “रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला, ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील”

“रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला, ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. या चार राज्यात जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला. यावरून आता रिपाई नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिला आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यात जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलाय. 2024 साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असून शिवसेनेने अजूनही भाजपा सोबत यावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी यावेळी शिवसेनेला दिला. यावरून आता शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : पुणे महापालिकेत भाजपच कमळ फुलणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील, असा पलटवार गुलाबराव पाटील यांनी केला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णय घेणारे नेते नाहीत. त्यांनी असं विधान करण्यापूर्वी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचं विधान अत्यंत चुकीचं आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असं विधान करणं शोभणारं नाहीत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना

 “परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली म्हणून मी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो”

आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं