आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पहायला मिळालं. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
10 मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार पडणार, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. याचाच पुनरूच्चार चंद्रकांत पाटलांनी आता पुन्हा केला आहे.
हे ही वाचा : शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी; देवेंद्र फडणवीसांची टीका
मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला, 10 तारखेला चार राज्य जिंकली आता पाहू, 11 तारखेला काय होतं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. निवडणुकीचे निकाल स्पष्ट आहेत. चार राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री बसणार आहेत. सगळ्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. उत्तरप्रदेशमध्ये सर्व्हे झाल्यास महिलांनी भाजपला मतदान केल्याचं स्पष्ट होईल. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नेते संजय राऊतांना आता ईव्हीएमवर आरोप करता येणार नाही. कारण पंजाबचे निकाल बोलके आहेत. पंतप्रधानांनी देशाचा चेहरा बदलला, किमान गरजा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे., असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”
जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका