“केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही”

0
500

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा काल वाढदिवस होता. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे जिल्हा भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना दरेकरांनी राणेंवर स्तुतीसुमने उधळली.

आपल्यावर आलेल्या सर्व संकटांवर मात करून पुढे जाण्याची उमेद देणारा राजकीय नेता म्हणजे नारायण राणे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री एवढी पदे मिळवित असताना त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर काटे, संकटे आली. पण, ती दूर करीत ते या पदांवर पोचले., असं दरेकर म्हणाले.

हे ही वाचा : वकीलांनी आपली बाजू कोर्टात मांडायची असते, रस्त्यावर नाही; प्रकाश आंबेडकरांचा सदावर्तेंना टोला

राजकीय क्षेत्रात काम करत असताना नेमका अभ्यास कसा करायचा, हे त्यांच्याकडून शिकता आले. कोकणचा विकास होण्यासाठी अजून किमान २० वर्षे नारायण राणे सक्रिय पाहिजेत. कारण, त्यांच्या उंचीएवढा कोकणात दुसरा नेता नाही, असं म्हणत दरेकरांनी राणेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे”

भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?; जयंत पाटलांचा सवाल

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here