“ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत, नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास एकत्र; चर्चांना उधाण”

0
494

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून जोरदार राजकारण सुरू आहे. अशातच काल ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल सूरू आहे.

अशातच दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला मात्र भाजप नेते नितीन गडकरी आणि संजय राऊत हे एकत्र दिसून आले. मग कारवाईनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय? असा प्रश्न उपस्थित झाला.

हे ही वाचा : भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला- रोहित पवार

दरम्यान, शरद पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण दिलं होते. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही पोहचले आणि शिवसेना खासदार संजय राऊतही पोहचले. या स्नेहभोजनावेळचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत संजय राऊत हे शरद पवारांच्या उजव्या बाजुला बसलेले दिसत आहेत, मध्ये शरद पवार बसलेले आहेत, तर डाव्या बाजुला नितीन गडकरी बसलेले आहे. त्यामुळे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

चंचल स्वभावाचे राज ठाकरे ऋतुप्रमाणे रंग बदलतात- गुलाबराव पाटील

“आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here