आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : शिवसेना- भाजप हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांच्यात सातत्यानं एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सूरूच असतात. अशातच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
शिवसेना-भाजप या दोन जुन्या पारंपारिक मित्रांमध्ये सध्या जे भांडण, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते थांबले पाहिजेत. मी हे भांडण मिटवून दोघांना एकत्र आणणार, असा दावा रामदास आठवले यांनी केला. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण…”; हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं
राज्यात सध्या जे चित्र आहे, ते काही जनतेच्या हिताचे नाही. शिवसेना-भाजप यांच्या भांडणात राज्याचे नुकसान होत आहे हे दोन्ही पक्षांनी लक्षात घ्यायला हवे. मी स्वतः या दोन पक्षांमध्ये समेट घडवून त्यांना एकत्र आणणार आहे., असं आठवले म्हणाले. तसेच सरकार पाडण्यावरून संजय राऊतांनी जे आरोप केले, त्यावरही रामदास आठवले यांनी यावेळी भाष्य केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना वाईट बोलण्यापासून रोखलं पाहिजे, शिवीगाळ करणे ही आपली संस्कृती नाही, असा टोला रामदास आठवलेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक दाखल”
“महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा केला साफ; उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर सर्व 15 जागांवर मारली बाजी”
मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ; कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचा सज्जड दम