Home देश गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्यानं संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींना टोला

गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्यानं संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डाॅ.मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

राजकारण्यांची गळाभेट घेतल्याने आणि निमंत्रण नसताना बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नसतात, असा उपरोधक टोला मनमोहन सिंग यांनी मोदींना यावेळी लगावला.

हे ही वाचा : हिंगोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची वर्णी

भाजपच्या नेतृत्वातील सरकारला आर्थिक धोरणांची समज नाही. केवळ देशांतर्गत धोरणातच भाजप सरकार अपयशी ठरलेलं नाही तर परराष्ट्र धोरणातही केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. चीन आपल्या सीमेवर येऊन बसला आहे अन् इकडे ते दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजची परिस्थिती चिंताजनक आहे. कारण सरकारच्या धोरणामुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. आपण केलेल्या चुका निस्तरण्याऐवजी मोदी वारंवार माजी पंतप्रधान नेहरूंना जबाबदार धरून टीका करत आहेत, असंही मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-मनसे युतीवरून पुन्हा चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचा मनसेला आणखी एक धक्का; रूपाली पाटील यांच्यानंतर आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

सोमय्यांनी फडणवीसच नव्हे तर अमित शहांच्या नावेही कोट्यवधींची वसुली केली; संजय राऊतांचा मोठा बाॅम्बस्फोट