आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या निर्माण केल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भातला किरीट सोमय्या यांचा जुना व्हिडिओ दाखवत, विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.
हे ही वाचा : नारायण राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे; आता संजय राऊत, म्हणतात…
किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंवर हे जे आरोप केलेले होते आणि त्यानतंर ईडीची जी चौकशी लागली, त्या चौकशीला घाबरून हे भाजपाला सरेंडर झाले, लाचारी पत्करली, शरणागती पत्कारली. म्हणून ईडीपासून त्यांचा बचाव झालेला नाही. किंबहुना आम्ही सर्व खासदार ईडीच्या कार्यालायास भेट देऊन, किरीट सोमय्या यांनी जे आरोप केलेले आहेत. त्या आरोपाची सखोल चौकशी झाली का? झाली नसेल तर केव्हा होणार. याबाबतची विचारणा ईडीच्या संचालकांकडे आम्ही येत्या एक दोन दिवसांत करणार आहोत, असं विनायक राऊत म्हणाले आहेत
दरम्यान, त्यामुळे आम्हालाही खात्री आहे की सोमय्या यांनी देखील, आज तुम्ही इतरांचे भ्रष्टाचार काढत असताना एकवेळ नारायण राणेंच्या विरोधात जे तुम्ही आरोप केले होते, जे पुरावे दिले होते. ते तुम्ही पुन्हा एकदा ईडी कार्यालयात द्याल,अशी आम्हाला आशा आहे. परंतु आम्ही मात्र ईडी कार्यालयात ईडी संचालकांना त्याबद्दल विचारणा करण्यासाठी जाणार आहोत, असंही यावेळी विनायक राऊत यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदार पुत्राचा भाजपात प्रवेश
उद्धव ठाकरे झुकले म्हणून मुख्यमंत्री झाले, सत्तेसाठी लाचार झालेल्यांनी…; रावसाहेब दानवेंची टीका
संजय राऊतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा; नारायण राणेंचा आरोप