आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं मनसेला मोठा दणका दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात हिंगणाघाट येथील पक्षाचे नेते अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने मनसेचे वर्धा उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर यांच्यासह 50 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
हे ही वाचा : शाळेत जाताना शाळेचा गणवेशच हवा, उद्या कोणीही उठून काहीही करेल- तृप्ती देसाई
या पक्षप्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते, वर्धा जिल्हा निरीक्षक राजुभाऊ ताकसाळे, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते, वर्धा जिल्हा निरीक्षक राजुभाऊ ताकसाळे, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे उपस्थित होते. pic.twitter.com/eOCmr8aUJ0
— NCP (@NCPspeaks) February 14, 2022
महत्वाच्या घडामोडी –
हिंदूहृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांचा विजय असो; घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून…; गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा आरोप