Home महाराष्ट्र काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून…; गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून…; गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला

अहमदनगर : जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे पार पडला. यात बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा तुफान फटकेबाजी केली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांनी या मेळाव्याचे आयोजन केलं होतं.

शिवसेनेचे जुने कार्यकर्ते कोणत्याही पदाच्या अपेक्षेने काम करत नव्हते. बाबासाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक काम करायचा. रड्या नावाचा कार्यकर्ता त्याकाळी नव्हता. आत्ताच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा आरोप

आपल्या गावात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे भूत येवू नये यासाठी वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा, असा मजेशीर सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे या अनोख्या सल्ल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, शिवसेना हा पक्ष नाही, संघटना नाही, तर तो एक विचार आहे. शिवसेना ही मुसलमान विरोधी नसून देशविरोधी भूमिका घेणारांच्या विरोधात आहे. शिवसेनेमुळं माझ्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज पुढं आलेत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसचं राष्ट्रवादीला मोठं खिंडार; सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये; आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 25 तारखेला पुणे दाैऱ्यावर”