आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सूरूवात केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी ठाण्यात चित्र मात्र वेगळंच दिसत आहे. पालिका निवडणुकीमध्ये अस्तित्व टिकून राहावे, यासाठी मनसेनं छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजसेवी प्रभूतींसोबत मोट बांधून ‘ठाणे विकास आघाडी’ स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मनसेच्या या नव्या आघाडीला प्रतिसाद मिळतो का?, हे आगामी निवडणूकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : ‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं आसावं; …या गोष्टीमुळे मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले
दरम्यान, गेली अनेक वर्षे ठाणेकरांना गृहीत धरून सत्ताकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांना धडा शिकवण्याचा संकल्प मनसेनं केला आहे. त्यासाठी छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजसेवी प्रभूतींची मोट बांधून ‘ठाणे विकास आघाडी’ रिंगणात उतरवणार असल्याचे सूतोवाच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांनी दिली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना लिफ्ट; चर्चांना उधाण
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंनी साधला संवाद, राजकीय चर्चांना उधाण”
“मला चिरडायला हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडेन”