आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवाजी पार्कात लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर होतं. यावेळी दिग्गजांनी लता मंगेशकर यांचं अंतिम दर्शन घेतलं. त्यांना आदरांजली वाहिली. लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवतीर्थावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींसह बडे राजकीय नेते मंडळीही श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कात हजर होते. यावेळी घडलेल्या या प्रसंगानं नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेतलं.
बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं, अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिली आहे. नेमका हा प्रसंग कॅमेऱ्यातही कैद झाला. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे बाबा शरद पवार यांच्यात घडलेला हा विशेष प्रसंग पाहून नरेंद्र मोदीही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी दिली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना लिफ्ट; चर्चांना उधाण
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, आदर पूर्वक जायला हवं, म्हणून ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांनी आपल्या पायातील बूट खालीच काढले होते. यानंतर ते खाली उतरले तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवार यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंनी साधला संवाद, राजकीय चर्चांना उधाण”
“मला चिरडायला हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडेन”
राज्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार-हर्षवर्धन पाटील आले एकत्र; चर्चांना उधाण