आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. लतादिदींच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली आहे. लतादिदींच्या निधनामुळं राज्यात देशात 2 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दिदींच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं.
यानंतर काही वेळानं ते मुंबईला लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी येणार आहेत, असं त्यांनी आपल्या ट्विट अकाैंटवरून सांगितलं. त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं. पण पंतप्रधान मोदीचं ज्यावेळी मुंबई विमानतळाला आगमन झालं त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.
हे ही वाचा : “मला चिरडायला हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडेन”
दरम्यान, याच वेळचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांचं स्वागत केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या सोबत मोदींनी चर्चा केली. काही काळ ते थांबले. मोदी, आदित्य ठाकरेंशी बोलले. यावेळी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Prime Minister Narendra Modi reaches Mumbai to attend the funeral ceremony of Bharat Ratna Lata Mangeshkar
(Pics source: Maharashtra Governor Office) pic.twitter.com/QelLRB8Dx1
— ANI (@ANI) February 6, 2022
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार-हर्षवर्धन पाटील आले एकत्र; चर्चांना उधाण
आदित्यजी, अमृता फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही…; चित्रा वाघ यांचा टोला