Home नागपूर नागपूरात महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?

नागपूरात महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही नागपुरात स्वबळाच्या दिशेनं तयारी सुरु केलीय. शहरातील 52 प्रभागात 156 जागांवर राष्ट्रवादीने तयारी सुरु केलीय. यासाठी नुक्कड सभा सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली. ऑफर आल्यास शिवसेनेचा विचार करु, असंही ते म्हणाले.

निवडणुकीसाठी सारे पक्ष सक्रिय झाले आहेत. भाजपने सर्व्हेवर भर दिला. अंतर्गत आणि बाह्य सर्व्हेचा रिपोर्ट आल्यानंतर उमेदवारी जाहीर केली जाईल. तोपर्यंत नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे.

हे ही वाचा : अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, पुन्हा तिकीट मिळते की, नाही, या चिंतेने भाजपचे नगरसेवक ग्रासले आहेत. समजा तिकीट मिळाली नाही. तर अपक्ष राहायचे, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी मागायचे की, शांतपणे पक्षाचेचं काम करायचे यावर त्यांचे चिंतन सुरू आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला?; किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले

उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?; अजित पवारांसोबत भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…