Home महाराष्ट्र “शेतकरी कुटूंब मारहाण प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका, ठाकरे सरकारला दिला इशारा”

“शेतकरी कुटूंब मारहाण प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका, ठाकरे सरकारला दिला इशारा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

डोंबिवली : जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना कल्याण ग्रामीणमधील दहिसर मोकाशी पाडा येथे घडली आहे. या मारहाणीत शेतकरी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप करण्यात आलाय.

तसेच या प्रकरणाला 22 तास उलटून गेले तरीही डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला जात नाहीये. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्यानं राजू पाटील हे पोलिस अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसले. गुन्हा दाखल करण्यासाठी राजू पाटील तब्बल 7 तास पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. यावेळी बोलताना राजू पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “सांगलीत सैराट सिनेमाची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केला म्हणून तरूणाला भोसकलं”

दरम्यान, आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, असं राजू पाटील म्हणाले. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआयआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत इनकमिंगचा धुमधडाका, भांडूप येथील शेकडो नागरिकांनी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत केला मनसेत प्रवेश”

“कोकणात शिवसेना आणखी मजबूत होणार, आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोकण दाैऱ्यावर”

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…