आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रिसाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अशातच साताऱ्यात ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात’ असं म्हणत त्यांनी मला विचारावे, मी त्यांचे आव्हान स्वीकारून पुराव्यासहीत सिद्ध करून दाखवायला तयार आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हंटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा : ‘…अखेर ‘बोक्या’ शरण आला’; शिवसेनेची नितेश राणेंवर टीका
महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने आम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शासनाला आम्ही आंदोलनातून वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यायलाच लावू. सर्वच मोठ्या पुढाऱ्यांची मुले दारू पितात. राजकारणात येण्याअगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील. आता यावर असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी”
“ राणे महासंत आहेत, त्यांची…”; नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा टोला
सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत; नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर