मी कच्च्या गुरुचा चेला नाही; धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा

0
169

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी आज प्रचारसभेत लोकांना संबोधित केलं.

आजचा दिवस माझ्या आयुष्यात का यावा? पंढरपूरच्या पांडुरंगाला मी प्रश्न विचारतो. माझ्या जीवनातील सर्वात मोठी सभा नानांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळीच मी सांगितलं होतं, नाना हॅट्रिक करणार ते. नानांचं आणि माझं नातं हे वडील-मुलाचं होतं. मी आशीर्वाद द्यायला नाही. तर भगीरथसाठी आशीर्वाद मागायला आलोय., असं धनंजय मुंडे म्हणाले.

भाजपने इथलं राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे. पोटनिवडणूक लागल्यावर विरोधात उमेदवार देण्याचं पाप यांनी केलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाचे पेशंट समोर येतायत. अशा परिस्थितीत ही निवडणूक लागायला नको होती. वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे 17 तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे.,भ असा टोलाही धनंजय मुंडेंनी यावेळी लगावला.

दरम्यान, मी कच्च्या गुरुचा चेला नाही. कोणाचीही पावसात सभा झाली की यांची धसकी भरते. मी कासेगावच्या सभेत सांगितलं होतं, मायच्यानं कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. टिका करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्हाला लोकशाही शिकवता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं., असंही धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात उद्या मध्यरात्री 12 वाजलेपासून लाॅकडाऊन?”

“करेक्ट कार्यक्रम हा शब्द चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहीतेय”

“मुख्यमंत्री आजच लाॅकडाऊनबद्दल निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार”

राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here