आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असून आता मनसेनेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली.
मनसेच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात ही बैठक झाली असून या बैठकीत मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा : अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, महापालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढविणार असून औरंगाबादच्या विविध प्रभागांमधून कार्यकर्त्यांचे संघटन निर्मितीवर भर दिला जात आहे. याच कार्याचा आढावा आज राज्यस्तरीय मनसेच्या नेतृत्वाकडून घेण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; हिंगोलीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा
“अग्रलेखातून राज साहेबांवर टीका करणाऱ्या ‘संजय’ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे का?”